◼️ काव्यरंग :- मोकळ्या केसात

मोकळ्या केसात

मोकळ्या केसात तुझ्या
माळलास तू गजरा,
मन माझे ग गुंतले
वळू लागल्या नजरा…

काळी ही कुंतले तुझी
आणि मोहक ग अदा,
पाहूनिया जीव माझा
झाला तुझ्यावर फिदा…

भाळी रूळणारी बट
मज बघ खुणावते,
तुझ्याविना मजला ग
सारे सुनेच वाटते…

पाहताक्षणीच सखे
प्रीत जुळली आपली,
मोकळ्या केसात तुझ्या
प्रेमांकुरे ग फुलली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *