◼️ काव्यरंग :- क्षितिज. ✍️सौ.भारती तिडके, गोंदिया

क्षितिज

दूर क्षितिजावरी नजर जाते
डोंगरावरील दृश्य छान
सूर्यास्ताची लाली पसरते
हर्षा चा नाद असतो महान

क्षितिज म्हणजे मृगजळ
डोळ्यांचा असतो भास
पण सृष्टीचे सौंदर्य पाहता
नयनी लागते आस

घन निळा बरसे अंबरात
घेई क्षितीजाकडे धाव
आकाशाचे धरे शी मिलन
उल्हसित होते मनी भाव

निसर्ग सौंदर्य पाहून
हरपून जाते मन
मावळतीच्या सूर्याची किरणे पाहून
पुलकित होते तन

प्रेमाच्या गाठी फुलतात मनी
मिळते नवी दिशा
जमिनीला आभाळ टेकते
क्षितिजाला भेटण्याची आशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *