◼️ काव्यरंग :- नातं प्रेमाचं

नातं प्रेमाचं

नातं प्रेमाचं असावं
सलोख्याचे नाव
एकमेकांशी ऋणानुबंध
जुळतील मनातील भाव

आई-वडील ,भाऊ-बहीण
नात असावं सुंदर
निसर्गाशी हि नाते असावे
सर्वांनी करावी त्याची कदर

गुरूचा मान सर्वात मोठा
संस्काराची शिदोरी दिली छान
सज्ञान केले सर्वांना
मार्ग दाखविला महान

पती-पत्नीचे नाते
संसारी असावे गोड
सुख दुःखात सदा सोबत
सहविचारांची असावी जोड

नात्याची वीण घट्ट असावी
सर्वांसोबत हदयाची
माणुसकी जपावी एकमेकांशी
नितळ मनाची

◼️ सौ.भारती तिडके, गोंदिया
8007664039

🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *