◼️ काव्यरंग :- कर्तव्यनिष्ठा

कर्तव्यनिष्ठा

ध्येयाने प्रेरित होवून
कर्मपथावर सतत चालती
कर्तव्यनिष्ठा तयांचे ठायी
यशशिखरा काबिज करती

ना संकटांची पर्वा
ना दुःखाची तया तमा
झेलून घाव ह्रदयावरी
कर्तव्यपूर्ती हाच वसा

विरह,यातना कितीही भयंकर
सावरण्याचे बळ अफाट
झंझावाती व्यक्तीमत्व असे
समभावाने करती दुःखावर मात

कर्तव्यच ते मानून तत्व
कर्मसिद्धांताची बांधिलकी
स्थितप्रज्ञ असे व्यक्तीमत्व
वंदन तयांचे चरणाशी

सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *