◼️ काव्यरंग :- मुक्ती संग्राम

” मुक्ती संग्राम”

मराठवाडा मुक्ती संग्राम
आहे लढ्याचा इतिहास
साधी भोळी माणसे इथली
माणुसकीचा इथे असे वास

मागण्या स्वातंत्र्य मुक्तीचे
दिला शौर्याचा लढा
हैद्राबाद संस्थानाचा
धैर्याने सोडविला वेढा

उद्धाम निजामशाही ला
धैर्याने आळा बसविला
होऊन संघटीत सकळजनाने
शरण आणले द्वाडाला

उठला पेटून मराठवाडा
देण्या तोंड अत्याचाराला

होऊन झाशीची राणी

आल्या रणरागिणी लढण्याला

केली न पर्वा जीवाची
प्राण पणाने सकल लढले
शूर स्वातंत्र सैनिक इथे
अमर हुतात्मे झाले

रणशिंग लढ्याचे फुंकले
निजामासजेरीसआणले
हैद्राबादलढा सफलझाला
मानाचा तिरंगा फडकवला

मराठवाडा माझे जन्मस्थान
त्याचा मला आहे अभिमान
लिहिली गेली वीरांची गाथा
इतिहासात असे सोनेरी पान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *