◼️ काव्यरंग :- अधिक मास (निलकाव्य)

अधिक मास (निलकाव्य)
———————————

सूर्य प्रदक्षिणा पृथ्वी
तिनशे पासष्ट
दिवसात पूर्ण करी
लिपवर्षाचे तिनशे सहासष्ट !

पृथ्वी प्रदक्षिणा चंद्र
एक चांद्रमास
घेई, वर्षात बाराच
यालाच म्हणतात चांद्रवरीस !

चांद्रवर्ष असे छोटे
अकरा दिवस
कालगणना भरून
काढे तीन वर्षांनी अधिक मास !

“पुरुषोत्तम” म्हणती
कुणी “मल मास”
पवित्र कार्य वर्जती
अश्विन यावर्षीचा वाढीव मास !

लक्ष्मी नारायण जोडा
लेक जावयास
पंचपक्वान्न करून
बडदास्त ठेवावी तयांची खास !

अठरा सप्टेंबर ते
सोळा आँक्टोबर
विष्णूनाम मनोभावे
जप करू, अधिष्ठाता देई वर !

◼️✍️ सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *