बुजगावने
उभ्या पिकांमध्ये काठ्यांना बांधून
त्याला विजार आणि सदरा घालून
डोक्याच्या जागी मडकंच ठेवती
डोळे नाक तोंड चुण्याने रंगवती
शेतकरी राजाची अजब शक्कल
टाकावू पासून हे तात्पुरते माँडल
पाखरांना माणुस असल्याचे भासे
पिकांस आशा प्रकारे राखीत असे
जगी काही माणसं असे वागतात
भरजरीचे वस्त्रे परिधान करतात
माझं डोकं सुपर असल्याचं सांगे
मला सर्व काही कळतं असं वागे
दुस-याच्या सुख दुःखात न जाणं
माणुसकी जराही लवलेश नसणं
आयुष्यभर स्वतःसाठीच जगणे
जसे हे हिंडते फिरते बुजगावने