◼️ काव्यरंग :- तुम्हा जगविलंच पाहिजे !

तुम्हा जगविलंच पाहिजे !

तुम्हामुळे मी जीवंत आहे ।
तुम्हा जगविलंच पाहिजे ।।धृ।।

ही नात्यांमुळे मानवता ।
ती नात्यांविण दानवता ।।
शांती माया प्रेम दया समता ।
जीवनी तरंग उठवित आहे ।।१।।

हे भाऊ ताई आई बाबा ।
ते मावशी आजी आजोबा ।।
अनावर तेणे वासनेवरी ताबा ।
वाढत्या वेलींना आधार आहे ।।२।।

झाडे-झुडे ही वल्लरी ।
शुद्ध हो हवेची बेल्लरी ।।
तयाविण जीव प्राण गुदमरी ।
सुवासी इच्छा जगण्याची आहे ।।३।।

हवे येथे प्राणी पशू पक्षी।
खरी सृष्टीवरी हीच नक्षी ।।
रक्षी आता रक्षी नरा कारे भक्षी ।
मम विकासी तू भकास होताहे ।।४।।

सारे परोपकारी तुम्ही ।
कसा वाणू किती कुणा मी?।।
कुचकामी या भूमी हा ‘कृगोनि’ ।
मेला तरी तो जग हे अधुरे नोहे ।।५।।

◼️कवी – “कृगोनि” (केजीएन.)
श्री कृ. गो. निकोडे, प्राथ. शिक्षक,
(संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक,
रामनगर वा. नं. २०, गडचिरोली, तह. जि. गडचिरोली.
भ्र. ध्व. ७७७५०४१०८६ ९४२३७१४८८३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *