◼️ काव्यरंग :- वारूळ

काव्यप्रकार : निलकाव्य

कवितेचे शीर्षक : वारूळ

वारूळ मिनार बांधी
लाल काळी मुंगी
रस्ते, मार्ग, कोठारेही
रचिते बुद्धीचातुर्याची देणगी !

मातीच्या कणाकणाला
जोडे क्षणोक्षणी
स्शापत्य शास्त्र नमूना
ईमारत राहिली ऊभी देखणी !

म्हणा तिला ईवलीशी
परि काम भारी
राणी मादीच्या सेविका
आदेश पाळिती मुंग्या कष्टकरी !

अन्नासाठी तळघर
जमिनीच्या खाली
शिस्तबद्ध व्यवहार
स्त्रावही सहकार्‍यांसाठी स्त्रवली !

राणी मुंगीचे कामही
नवनिर्मितीचे
वंश वाढता वाढवी
साम्राज्य वसवी जणु वारुळांचे !

मनमोहक ही गाथा
कष्टाचा प्रवास
सलाम त्यांच्या कार्याला
आपण सारे करु दिलखुलास !

◼️✍️◼️ सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *