प्रीतीच्या झुल्यावर
तुझी नि माझी
प्रित जुळावी रेशीमगाठी
हृदयी असावा प्रेम भाव
अमृतवाणी असावी ओठी
प्रीतीचा सुगंध दरवळावा
राणी पारवा फुलतो
प्रीतीच्या झुल्यावर बसून
मनी आनंद डुलतो
सृष्टी नटली हिरवळीने
वाहतो मंद धुंद वारा
तुझ्या प्रेमात दंग झाले
वाटतो जणू शुक्राचा तारा
प्रीतीच्या झुल्यावर बसून
रंगवूया गोड स्वप्ने मनी
तुझे सौंदर्य लोचनी सामावते
शहारतो गारवा तनी
थंडगार वारा
वाहतो प्रीतीचा छान
सख्या तुझी आठवण
राहते हृदयात नीतिची महान
अबोल मनाच्या गाठी
प्रित तुझी माझी खास
तुझ्या स्वप्नात दंग झाले
हरपले तुझ्या सहवासात
सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया, 8007664039
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷