◼️ काव्यरंग :- कर्मवीर


कर्मवीर

निश्चयाचा महामेरू,
बहुजनांचा आधारू,
रयत कल्पतरू,
युगपुरूष कर्मवीर….

त्यागस्थंब, तेजपुंज्य,
बुद्धध्यान, तत्वशील,
ज्ञानज्योत, दिव्यरूप,
स्वावलंबी कर्मवीर….

स्मितभाषी,बालप्रिय,
ध्येयनिष्ठ,कर्मयोगी,
युगधंर, लोकप्रिय ,
पद्मभूषण *कर्मवीर*….

देशप्रेम, क्रांतीसुर्य,
दुरदुष्टी, ध्येर्यशील,
न्यायमुर्ती, नितीवंत,
धर्मसहिष्णू कर्मवीर…

संतस्नेही, मित्रप्रिय,
सत्यमार्ग, दयावान,
क्षमाशील, भगीरथ,
पुण्यशील कर्मवीर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *