🔴 शेतकऱ्यांचा वाली कोन ?
सद्यस्थितीत शेतकऱ्यांवर काय संकट आलय , त्यात शेतकरी वर्गाचे किती कसे कसे हाल झाले आहेत , तो या रोगाचा सामना करत करत असतांना नैसर्गिक आपत्तींचा ही शिकार होतोय .हे कोणी पहात आहे की नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे
आज पहायला गेलं तर महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे.त्यांनी केलेली मेहनत व गाळलेल्या घामाच निसर्गान चांगलच फळ दिलं आहे.सतत असं निसर्गाच शेतकऱ्यां सोबत क्रूर वागणं थांबेणा झाले आहे , सारखाच निसर्ग हा शेतकऱ्यांच्या मागे हात धुऊन लागल्या सारखा वागत आहे. तसं पाहायला गेलं तर हे आजचे च काही नवीन नाही मागील वर्षी ही निसर्गान शेतकऱ्यांचा असाच छळ लावला होता , अनं या ही वर्षी तो पदरात आलेले पिंक घालवत आहे .शेतकऱ्यांच्या आयुष्यात निसर्गानं सुखं कधीच दिलं नाही याच कारणांमुळे शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज बाजारी होतोय .त्यांच्या आयुष्यात निसर्ग कधीच चांगला वागत नाही , अन चांगला वागला जरी तरी मात्र तो वर्षांनी वर्ष टिकून राहत नाही .निसर्ग जर प्रत्येक वर्षी चांगला च राहिला तर कोण्याही शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी पणाची वेळ येणार नाही , त्याला कोणासमोर हाथ पसरावे लागणार नाहीत .पण असे होत नाही , निसर्ग कधीच त्याला सूधरु देत नाही , निसर्ग जर नीट वागला तर शेतकरी रस्त्यावर येणारं नाही ना , त्याचं जगणं वाऱ्यावर होणार नाही , सर्व शेतकरी सुखी होतील , त्यांना कोणाची गरज राहणार नाही ना , म्हणून निसर्ग नेहमी क्रूर वागतोय साऱ्या शेतकऱ्यांबरोबर असंच म्हणावं लागंल .
निसर्गाला वाटत नाही कधी कोण्या शेतकऱ्यांच चांगल व्हाय , चांगल झाल्यावर त्यांची मुलं शिकून मोठी होतील ना , त्याला सतत याच्या त्याच्या दारी पळायची वेळ येनार नाही ना , म्हणुन घेतोय की काय हा सूड सर्व शेतकरी वर्गांचा .
निसर्गाच्या ह्या सतत बदलत्या वागन्या मुळे अता शेतकऱ्यांचे वाली कोणी उरलेच नाही असं वाटायला लागलं आहे . प्रत्येकक्षात त्याचा छळ निसर्गानंच सुरू केला तर बाकीच्यांना दोष देऊन ही काय होणार आहे .तरीही मात्र सर्व शेतकऱ्यांनी विचार करण्यासारखी चिंतेची बाब आहे , जेंव्हा निवडनुका लागल्या होत्या , तेंव्हा अनेक नेत्यांनी मोठं मोठ्या सभा गाजवल्या होत्या , प्रत्येक सभेत प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेता प्रत्येक वेळी शेतकऱ्यांन बद्दल किती आपुलकी आणि प्रेम दाखवत होता , काय काय त्या घोषणा करत होता , मंग आज या संकटात काय होत आहे त्याला शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांची किती नुसकान झाले आहे ते पहायला , का कोणी येत नाहीये निसर्गानं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणुन नेत्यांनी देखील तेच करायच का .कुठं गेलं शेतकऱ्यांवरील साऱ्याच प्रेम , की फक्त सभेपुरते होते ते ? शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा सुध्दा वेळेवर होत नाही कधी मुगाचे पिंक नासुन जात तिथं ज्वारी पेरल्या च्या नतंर पंचनामा करण्यासाठी येतात ही किती दुर्दैवाची बाब आहे , शेतकऱ्यांनी पिकांचा पंचनामा करण्यासाठी किती ही कालावधी गेलेलं पिंक तसंच ठेवायच का , त्यात दुसरं घेऊ नये का , किती वाईट अवस्था आज शेतकऱ्यांची निसर्गान करुन ठेवली आहे , त्याला सरकार मदत मात्र देते पण वेळेवर का देत नाही ? सरकारची का अशी व्यवस्था असेल अरे खरी गरज असते पिंक उध्वस्त झाल्या झाल्या पण तसं कधीच होत नाही काही काही वेळा अनुदानाचे पैसे येतात वरीस सहा महिन्याने तोपर्यंत शेतकऱ्यांचा राहिला साहीलेला माल तयार होऊन त्याचे देखील जीवनाला थोडा हातभार लागलेला असतो मंग अश्या वेळी अनुदान देऊन मदत होणार का ? , योग्य वेळी तात्काळ का मदत करत नाही कोणी , खरं तर असं वाटायला लागलं आहे .या जगात शेतकऱ्यांच कोणी च नाहीये फक्त सामजिक लोकप्रियता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाने मोठं मोठ्या घोषणा करत होते की काय , पण आज त्यांच्यावर दुःख कोसळल आहे तर त्याला सावरायला कोणीच येत नाही असं का ? , अरे साऱ्या जगाला जगवानाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज अश्रू वाहात आहेत त्या अश्रू ना पुसणारे कोणीच कसे उरले नाही ही खूप मोठी खंत येथील प्रत्येक शेतकऱ्यांला वाटत असेल ना .माय बापानो खरच शेतकरी टिकला तरच जग टिकणार आहे , मंग त्याला का आधार देत नाही कोणी ? का योग्य वेळी मदत मिळत नाही , प्रत्येक संकटात का त्याला वाऱ्यावर सोडलं जातंय , का त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च कमी करत नाही कोणी .अश्या खूप काही बाबी आहेत ज्या काळजाला कुरतडुंन टाकून मनात वेदना दाटून आणतात .जगाला कोणाचं घेणं देणं नाहीये शेतकरी वाचला काय अन नाही वाचला काय कुणाच काही होत नाहीये . फक्त दुःख होतंय ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांलाच म्हणुन वाटतय या जगात शेतकऱ्यांच कोनी वाली उरलाच नाही तो प्रत्येक संकटात नेहमी एकटाच लढतोय जगाला त्यांच्या जगण्या मारण्याची काहीही चिंता नाहीये की काय ? असं वाटायला लागले आहे .
◼️🔷✍️🔷◼️
◼️अंगद दराडे ,माजलगाव, बीड
8668682620
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️