◼️ काव्यरंग :- गवगवा

गवगवा

इथे इंग्रजांच्या क्रिकेटचा
होतोय बेफाम गवगवा
मात्र मातीतील खेळांना
योग्य न्याय का नसावा?… //

पैसा, प्रसिद्धी,अन् ग्लॅमर
क्रिकेटला मिळे वारेमाप
कबड्डी, कुस्ती, खोखोने
कळेना कोणते केले पाप….. //

आयपीएलच्या कुंभमेळ्यात
चढ्या भावाने लागते बोली
एकाच हंगामात करोडपती
बक्षिसांची वेगळीच थैली… //

येथे मातीत लोळतो मल्लं
खुराकाला पैसा नाही
कसा बनावा देह पिळदार
पाठीराखा कुणी नाही… //

येथे सर्वच देशी खेळांची
अशी दुरावस्था हमखास
सव्वाशे कोटींच्या देशाला
आॅलिंपिक मध्ये वनवास… //

मातीतल्या खेळ खेळाडूंचा
सांगा कधी होईल गवगवा
सचिन,धोनी,विराट सारखी
खाशाबाचीही व्हावी हवा…. //

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *