◼️ काव्यरंग :- प्राजक्त

प्राजक्त

प्राजक्ताचा सडा
पडला अंगणी
मन मोहून जाते
प्रसन्न होते अवनी

प्राजक्ताची फुले
असतात नाजूक
परमेश्वराच्या चरणी वाहतात
भाव मनी साजूक

दरवळतो प्राजक्ताचा
सुगंध फार
मन आनंदी होते
सुख मिळते अपार

केशरी काडी पांढरी फुले
असतात खूप न्यारी
सर्वांचीच मन भावत असतात
वाटतात ती प्यारी

पहाटेच्या वेळी
सृष्टी नटते हिरवळीने
पक्षी किलबिल करतात
प्राजक्ता च्या उमलल्याने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *