पहाट
निशाराणीच्या विपुल केशपाशात
गुंतला रविराज साखरझोपेत
जाग येता चुळबुळे रजनी
म्हणे स्वामी करा सैल
बाहुपाश, मदना !
वाढली पानात सळसळ
भास्करा, वेळ पुण्य आली
अशावेळी आपण शय्येवरी
राजसा, ऊठा चंद्रमा चांदण्यांसवे
मग करेल आपली थट्टा !
करी घट्ट मिठी म्हणे सुट्टी मला
घ्यावीशी वाटते रमणी कसे कळेना
तुला शीणलाय रोजरोज जीव उगवून
म्हणे राणी, राजास प्रथम प्रजा मग मौज
याल संध्येस प्रियकरा करीन स्वागत !
रती तू गं भारी शहाणी
चल देई एक चुंबन मग उठेन सत्वर
निशेवर होई वर्षाव लज्जीत होऊनी पळे
क्षितीजापाशी अडखळे पाठोपाठ रवी
पाही तिच्या गालावर पहाट लाली!
“प्रिया प्रकाशची”, ठाणे