◼️ काव्यरंग :- हिरकणी

!!!! हिरकणी !!!!

हिऱ्या सारखे डोळे तिचे

सोन्यासारखे मन आहे,
नावाला ती शोभून दिसते
कर्तव्यने ही महान आहे !!1!!

वाकुसरे हे गांव हिरकणीचे
धनगर समाजाची आहे गवळण,

आई, वडील, पती, तान्हे बाळ
रायगड करतो तिची पाठराखण !!2!!

सांज सकाळी दूध विकण्या
रायगडावरती जात असे,
छोटे कुटुंब सुखी कुटुंब
इमानदारी त्यांची सदा दिशे !!3!!

होते आभाळ भरून आलेले
पावसाने ही करच केला,
उशीर झाला घरी जाण्यास
सुर्यदेवही मावळून गेला !!4!!

निशा होता रायगडा वरती

दरवाजे सारे बंद झाली,
बाळाच्या त्या प्रेम ओडीने
व्याकुळ झालीहो माऊली !!5!!

हात जोडुनी करी विनवणी
जाऊद्याहो बाळ माझे घरीआहे,

गडकरी म्हणे नाही उघडत दरवाजे
राजे शिवरायांची आज्ञा आहे !!6!!

लेकराच्या त्या आठवणीने
प्रेम पान्हा ही ऊरी दाटे,
कडा ऊतरुणी आली घराला

बाळाला ती तात्काळ भेटे !!7!!

अतुलनीय तिचे धाडस एैकून
राजे शिवराय मनी आनंदले,
साडी चोळीचा आहेर देऊन

हिरकणीस त्या सन्मानित केले !!8!!

त्याच कड्यारवर बुरुज बांधून

नाव दिले त्या गवळणीचे,
हिरकणी बुरुज म्हणून गाजला

ईतिहासी नांव गाजे आईचे !!9!!

शिवकवी शिवश्री अडसूळ पाटील
मो. 93 25 29 41 98

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *