स्वप्नातलं गाव
पाहिले होते मी
स्वप्नातलं गाव,
स्वप्नाची नगरी
होते त्याचे नाव…
गावाच्या भोवती
रांगा डोंगराच्या,
होत्या नागमोडी
वाटा वळणाच्या…
पहावे तिकडे
होते सुजलाम,
नव्हते कुणीही
कुणाचे गुलाम…
लहान नि मोठे
खूश होते सारे,
वाहती सर्वत्र
आनंदाचे वारे…
गाई गुरांसाठी
मुबलक चारा,
वाहे मधोमध
शुभ्र नदी धारा…
सुख समृद्धीने
नटलेले गाव,
असे होते माझ्या
स्वप्नातले गाव….
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️