◼️ काव्यरंग :- मूर्ती लहान ✍️कवी – राजेंद्र उदारे

📲 मूर्ती लहान

जग मुठीत ठेवणारं अस एक यंत्र
खरं व खोटं सहज बोलण्याच तंत्र

बालकं असो की वयोवृद्ध व्यक्ती
चोवीस तास उपभोगण्यास मुक्ती

दृक् श्राव्य माध्यम विज्ञानाचा नमुना
घडयाळ कॅमेरा सुविधा प्रकार नाना

माहिती तंत्रज्ञानाचे प्रगतीशील संच
गर्भश्रीमंत सर्वसामान्यही वापरतातच

वैयक्तीक सामाजीक शासकीय कामे होई
वेळ पैसा श्रम याचा अपव्यय टाळता येई

खिसा पर्स कुठंही याचं ठिकाण असे
घर ते जगभर भ्रमण करताना दिसे

भरपूर इंटरनेट असेल सोबतीला
मग काहीच तोटा नसे आंनदाला

साक्षात दिसते छबी अनेक विषय गहन
भ्रमणध्वनी किर्ती महान जरी मूर्ती लहान

🔶 कवी – राजेंद्र उदारे
📲 ८६२३९९०८०७

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *