◼️ काव्यरंग :-धोंड्याचा महिना

धोंड्याचा महिना

आला बघा धोंड्याचा महिना
लवकर जावई नटवा,
पुरण पोळीचे जेवण
खायला सासरवाडीला पाठवा…
दारु पायी याच्या
जीवाचे झाले हाल,
घरादारात याचा
नेहमीच जातो तोल…
लई मारतोय बाई गं
नेहमीच होवून आडवा,
आतातरी याला कुणी
चौदाव रत्न दाखवा…
या दारु पायी माझा
संसार झालायं कडवा,
पिवून,पिवून वाढलयं दुखणं
कुणीतरी याला डाँक्टरला दाखवा…
येई मनात माझ्या
समजून घ्यावं थोड,
शेतकरी बाप माझा,
नका पळवू तुमचंच घोड…
कुणीतरी हातभार लावा ना आता
माझ्या नवऱ्याला लवकर नटवा,
आला आता अदिक महिना
जेवायला सासरवाडीला पाठवा…

◼️ राजेंद्र लाड (शिक्षक)
आष्टी,जि.बीड , मो.९४२३१७०८८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *