………प्राजक्त ………
नाजूक कोमल फुले पाहूनी हर्ष जाहला बहू मनी,
धुंद गंधाने भान हरपले बेभान झाले सारे अंगणी !
शुभ्र कळ्या नि देठ केशरी प्राजक्ताची फुलेच न्यारी,
सत्यभामा नि रूक्मिनीची शामसुंदर शी प्रीत बावरी !
रंग पांढरा साक्ष देतसे निस्वार्थी या त्यागाची,
रंग केशरी देते आठवण अतुट प्रीतीच्या नात्याची !
मनमोहक तो परिमळ वाटे घ्यावा साठवून काही क्षण,
बहर येईल चैतन्याला जाई शहारून सारे तनमन !
हिरव्या पानांच्या दाटीतून पहा फुलांचा किती हा बहर,
त्याग करूनी नात्यांचा ती पहा निखळली कशी भूवर!
मानवाने ही त्यांचसमान त्याग करावा स्वार्थाचा,
प्राजक्ताच्या फुलांप्रमाणेच करू या वर्षाव प्रेमाचा !!
◼️ सौ.सुनिता नाईक, कुरूळी.
मो.8080362939