🔴 लेक लाडाची..
लेक लाडाची
माझी मुलगी छान
प्रीतीचा झरा आहे
सर्वांची ती शान
रूपाने तसेच गुणांनी
आहे परिपूर्ण मूर्ती
जणू अप्सरा शोभते
भावनांची करते ती पूर्ती
भुरभुरणारे केस तिचे
मधुर मोहक अल्लड हसते
सर्वांना ती भावते
गोड गोजिरी ती मनात बसते
लाल गुलाबी तिचे ओठ
स्मितहास्य असते गाली
रूप लावण्य मनोहर तिचे
ओठावर असते जणू लाली
लेक लाडाची माझी
मला वाटे भारी माप
सर्वांची आवडती ती
कौतुकाची पडती