भेटीचे क्षण
अंतरात दाटलेत हे अनमोल प्रीतकण
विनविते सख्या मी यावे मिलनाचे क्षण
तुझ्या आठवणीने बागडते वेडे मन….
साद घालिते मनापासूनी माझे हे तन……
असशील तेथुनि ये धावत सख्या….
झुरते मिलनासाठी माझे अंगण……
प्रीत फुलेही कोमेजली…..
उचंबळले हृदयीचे स्पंदन…….
नको दुखावू भावना कोमल.
होऊन जाईल मनही विफल…..
असह्य त्या अंतरीच्या वेदना…
विरह सांगतोय कानी हा दर्पण…..
स्वप्न तुझे हे मनी बिंबले….
दे साद मजला सख्या मी आतुरले.
दु:खावरती घाल तू फूंकर…..
आसावले हळुवार माझे मन…..
तुझ्या प्रीतीचा हा पसारा
आवरून दुःखाचा डोंगर
नाचतो मनमोर फुलवून पिसारा