◼️ काव्यरंग :- बांधिलकी

बांधिलकी

जिकडे-तिकडे आतंकवाद अन्
दहशतवाद माजला आहे
या देशाला हिंसाचाराचे
ग्रहण लागले आहे

जो तो आपलीच पोळी भाजण्यासाठी
भ्रष्टचाराला खतपाणी घालत आहे
स्वस्वार्थासाठी बुद्धी गहाण ठेवून
तो माणूसकी विसरत चालत आहे

अन्याय,अत्याचार, जुलूम, जबरदस्ती
हात त्याचे सरसावत आहे
माणूसकी बाजूला ठेवून
क्रूरतेने वागत आहे

अश्या त्याच्या वागण्याने
मानवतेला काळे फासत आहे
या देशाला लागलेले ग्रहणातून
आतातरी सुटका करायची आहे

यासाठी प्रेम ,आपुलकी
मनामनात रूजवायची आहे
बुद्धाची शिकवण सा-यांनी
अंगीकारायची आहे

सर्वानप्रती बांधिलकी ठेवून
गुण्यागोविंदाने नांदायचे आहे
विश्वशा़ंतीच्या मार्गाने
देशाला प्रगतीपथावर न्यायचं आहे..

सह प्रशासक मराठीचे शिलेदार समुह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *