…ही जात कशी रे…
जात मनता मनता
माणूस पूर्ण आयुष्य जगते,
जात काही संपत नाही
मात्र आयुष्य पूर्ण संपते,
माणसा ही जात कशी रे….
जन्मताच माणसाला
जातच मिळते,
आयुष्याचा घोडा हा
जातीवरच अडते,
माणसा ही जात कशी रे….
जग बदलत चाललं
पण जात बदलली नाही,
सर्वधर्मभाव शिकवलं
माणुसकी शिकवली नाही,
माणसा ही जात कशी रे….
जातीजातीने वैर करतात
अडचणीत मात्र जात विसरतात,
अशीच नेहमी जात विसरेल
गुण्यागोविंदाने माणुसकी नांदेल,
माणसा ही जात रे….
◼️कवी… राज गुरनुले
मु. पो. गुंजेवाही ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर
मो. 9527873626