◼️ काव्यरंग :- मी पण 

मी पण 

उसळणारा सागर पाहून
हरवून गेले माझे मी पण,
लाटावरती स्वार होऊन,
जगून घ्यावे काही ते क्षण !
मऊ मऊ वाळू वरती,
नक्षी काढावी पायाने,
येता लाट वेगाने अन्,
वाहून जावी पाण्याने !
नारळी अन् सुपारीची,
चाले स्पर्धा गगनाशी,
माशांची ही जलक्रिडा,
त्या सागराच्या पाण्याशी !
घोंगावणारा अवखळ वारा,
अवचित वाटे यावा कानी,
गुज सखीचे ऐकू येवून,
मोरपीस फिरे गालावरूनी!
लाटांच्या त्या आवाजाने ,
पुन्हा भानावर आले मन,
माणसाने ही जीवनामध्ये,
सोडून द्यावे काही ‘मीपण’!
सागरासम विशाल करूया,
संकुचित हे आपले मन,
भेदभावाला दूर सारून,
घेऊ सर्वांना सामावून !!!!
◼️🔷✍️🔷◼️
सौ.सुनिता नाईक,कुरूळी
मो.8080362939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *