◼️ काव्यरंग :- ओली स्मृतीचित्रे

शीर्षक : ओली स्मृतीचित्रे
————————————

अकस्मात येई कुणी जीवनी
खळबळ होई अकल्पित मनी

निरखे पावसात भिजली काया
अनोळखी असूनी दाखवी माया

स्वप्न जागेपणी दिसू लागे
चालताना वळून पाही मागे

जाग येता कल्पना भंगते
सत्यात प्रित ह्रृदयास दुभंगते

ओल्या सांजवेळी स्मृती चाळविती
अवचित चलचित्रे भावना हेलाविती

◼️✍️ सौ.प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *