पुरुषोत्तम मास !
[ निलकाव्य रचना ]
नर घडवी उत्तम,
म्हणून बोलती.
मास तो पुरुषोत्तम,
सन्मार्गाने भक्त भाविक चालती !१!
वैशिष्ट्य हे भारताचे,
नच अन्य देशी.
मंत्र अहिंसेचा देतो,
दया प्रेमाचे धडे या मायदेशी !२!
तीन तीन वर्षांनी हा,
परिमळ देतो.
मानवता विसरता,
तुम्ही का? म्हणत आठवून देतो !३!
तया अधिक मानती,
नावे ही ठेवती.
धोंडा मल ना संसर्प,
ज्ञानी पुरुषोत्तम मास वदती !४!
म्हणे ‘श्रीकृष्णदास’ हा,
ना अपशकुनी.
खास पाळावी मर्यादा,
जातो पुरुषां उत्तम घडवुनी !५!
◼️🔷✍️🔷◼️
कवी – श्रीकृष्णदास जी. निकोडे [ अध्यापक ]
मु. पोटेगावरोड, पावर स्टेशनच्या मागे,
रामनगर, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.मो. नं ७७७५०४१०८६.
इ-मेल – krishnadas.nirankari@gmail.com
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️