निस्वार्थ भावना
निस्वार्थ भावना
असावी मनी
कार्य तेव्हाच पूर्ण होते
फळ मीळते जनी
अहंकार दूर करावा
दीनदुबळ्यांची करावी सेवा
स्वार्थाला बाजून ठेवले तर
जीवनात मिळतो मेवा
फळाची अपेक्षा न करता
निस्वार्थ भावना असावी छान
सर्वांच्या प्रती आदर ठेवावा
प्रेमाची वर्तवणूक असावी महान
सुखदुःखात सामील व्हावे
जाणावा दुसऱ्यांच्या मनातील भाव
नेहमी मदतीची भावना ठेवावी
सर्वांच्या मुखी असेल तुमचे नाव
निस्वार्थ भावना असावी
जीवना मिळते आशीर्वाद फार
पुण्य लाभते सत्कर्माचे
आनंदप्राप्ती होते अपार