◼️ काव्यरंग :- वाळूतल्या रेषा

वाळूतल्या रेषा

आठवतात तुला सखी
त्या वाळूतल्या रेषा…
घरासमोर असायची ती
बांधकामाची पडलेली वाळू
पाय घालून त्यात आपण…
बांधत होतो इमले…महाल
त्याभोवती असायची कधी
तुझी माझी हद्द सांगणाऱ्या
त्या वाळूतल्या रेषा बारीक
समोर लावायचो लुटपुटा…
हिरव्या गवताचा बगीचा
खूप हरखून जायचो आपण
वाळूंनी बांधलेल्या त्या घरात
मग आईची हाक यायची
आपणच बांधलेले ते घर
मोडून निघायचो घराकडे
पण एक नवी आशा घेऊन
उद्या परत येऊ या इथेच….
नव्याने वाळूचे घर बांधण्या
तुझ्या-माझ्या मैत्रीची साक्ष देण्या

©मराठीचे शिलेदार समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *