मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि.३०/०९/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न‘ स्पर्धेतील ‘शब्दवीर‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.
-II आम्ही शब्दवीर ll-
शब्दधन जोडूनिया
काव्य लिलया साकारु
कल्पनेचे कल्पतरू
स्वच्छंदी मनपाखरु ॥
आम्ही शब्दांचे पुजारी
वेचू अक्षरांचे मोती
तुकोबांच्या अभंगाची
गाऊ संथा गाथा पोथी ॥
आम्ही शब्दवीर खरे
शुध्द विचारांचे धनी
अमृताची गोडी भाषा
संस्कृतीचा ठेवा मनी ॥
शब्द बनती आधार
शब्द बनती सामर्थ्य
शब्द आमुचे दैवत
शब्द देती अन्वयार्थ ॥
मराठीचे शिलेदार
शब्दांचीच वेचू फुले
काव्य बहार येताच
समुहात हर्ष डुले ॥
श्री दत्ता काजळे (ज्ञानाग्रज) उस्मानाबाद
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️
आम्ही शब्दवीर
आम्ही सदस्य मराठीचे शिलेदार
आहोत शब्दसृष्टीचे ईश्वर …
वसे सरस्वतीचे निजस्थान
वंदू आम्ही शब्दवीर …..
सागरातून काढू शब्दरत्न
व्यक्त होण्याचे मुक्त सरोवर
निर्माण केले दादांनी…
अनेक बुद्धीचे भव्य आगर
सादर करतो श्रुतीचा भावगर्भ
वाचनाची आगळी पर्वणी
कविरुपातून सांगून निजबोध
भरभर चालते लेखणी
झणझणीत घालतो अंजन
समाज विचारांचे साधन
शब्दातून भवगर्भी उतरतो
आम्ही ह्रदयीचे स्पंदन
ध्यास कवित्वाचा प्रबंध
लिहितो नाना मुद्रा छंद
काव्यातून रस देतो . ….
करतो गद्य पद्य भेदाभेद
सृष्टीचे आम्ही शब्दवीर
नाही आमचा हा व्यापार
झाले.. पुढे होतील अपार
काव्यातून करण्या जगोद्धार
सिंधू बनसोडे ,इंदापूर ,जि -पुणे
©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह
🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️
आम्ही शब्दवीर
संत साहित्य आम्ही नित्य वाचतो
ज्ञान तुकयांच्या सत्संगी नाचतो
आम्ही तुकयांचे अभंग रचतो
शब्दवीर आम्ही कधी न खचतो
शब्द गोडवा आम्ही स्नेहाने देतो
संस्कृती रक्षणाचा ध्यास ही घेतो
सुगंधी ठेवा देश-विदेशात नेतो
शब्दवीर साहित्य वारीस जातो
निराधारांचा आम्ही आधार होतो
त्यांच्यासह प्रेरणादायी गीत गातो
शब्द सरीत चिंब चिंब नाहतो
आम्ही शब्द वीर सर्व सुख पाहतो
आम्ही शब्दांची पूजा करतो
साहित्य पुष्प नित्य हाती धरतो
शब्दवीर आम्ही शब्दांस वरतो
शब्दधन आम्ही मनोमनी पेरतो
भुकेल्यास अन्न तहानेल्यास नीर
दुःखीतास देतो सदैव आम्ही धीर
अन्यायावर सदा शब्दांचेच तीर
असतो निर्भिड आम्ही शब्दवीर
आम्ही शब्दवीर- आम्ही शब्दवीर!
श्री पौळ विनायक शेषराव
पालम, परभणी
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️📘🖋️
मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖