◼️ काव्यरंग :- दुःखातही शोध सुखाचा

दुःखातही शोध सुखाचा

जीवनात प्रत्येकालाच सुख आणि
दुःखाचे क्षण अनुभवायचे आहे ,
मग दुःखाच्याच वेळेला का ?
अश्रू डोळ्यातून धळाधळा वाहे

दुःखाताही सुखाचे क्षण
शोधत असावे ,
कारण आज जीवन आहे
उद्या ते असावे अथवा नसावे

जीवन जगतांना नेहमी
हसतमुखाने जीवन जगावे,
आणि आपल्या शेजारी असणाऱ्या
लोकांशी नेहमी प्रेमाने वागावे

सागर जसे सामावून घेते
प्रत्येक दिशेने आलेल्या पाण्याला ,
तसेच आपणही मार्ग मोकळा करून द्यावा
घृणा आणि त्रिष्णा बाहेर जाण्याला

काळी – काळी करून गोळा
घरटं बांधते चिमणी जशी ,
अशीच असावी आपली करणी
छोट्याशा कामातूनही प्रेरणा मिळेल तशी

येत नाही परतुनी जीवनात
गेलेले ते क्षण ,
दुःखात असूनही सुखाची जाणीव करून देणारे
असावे आपले असे मोठे मन

प्रवाह वाहतो जसा
जास्तकडून कामाकडे पाण्याचा ,
तशीच हिम्मत असावी
दुःखातहि असतांना शोध सुखाचा घेण्याचा

◼️🔶✍️🔶◼️

कवी :- विशाल गेडाम , वासेरा , चंद्रपूर
भ्रमणध्वनी:- ९११२१६०९६६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *