◼️ काव्यरंग :- बापूजी

बापूजी

सत्याग्रह आणि अहिंसा
धारदार अशी तुमची शस्त्रे
बंदूक तलवारही तुम्हांपुढे
उणी पडायची अशी अस्त्रे

हिंसा मारामारी जाळपोळ
नसताना स्वातंत्र्य मिळवले
नमवलेत हो बापू गोऱ्यांना
चले जाव म्हणूनच नमवले

हातात घेतलाच नाहीत हो
कधीच तुम्ही निष्ठूर कायदा
करून असहकार आंदोलन
साधला मुक्तीसाठी फायदा

मीठाचा सत्याग्रह करण्यास
चाललात एवढे प्रचंड अंतर
तुमच्या या सौजन्याचा बापू
चालायचा गोऱ्यांवरती मंतर

तुमची राजनीती ना आवडली
संघातील गोडसे माथेफिरूला
संघ चालवणाऱ्या महाभागांची
फूस होती त्या कृष्णकरणीला

बापू स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न
तुमचे जाणारच नाहीत वाया
हजारो बापू तुमच्यासारखेच
गेलेअर्पिण्या बलिदाना काया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *