-ll सावली ll–
तू प्रकाशात साथ देते
तू काळोखात दुर जाते
तू खुजी होऊनही जाई
तू उंचच उंच दिसून येई
तू कधी पाठीमागे असे
तू पूढे पूढे आम्हा दिसे
तू कधी लठ्ठ दिसतेच
तू भासे सडपातळच
तू मध्याना पायाखाली
तू अदृश्य पणे निराळी
तू असता आधार फार
तू नसता वाटे निराधार
तू माझ्या पेक्षा निराळी
तू काळी आणं सावळी
तू ऊन व प्रकाश सोसते
तू अस्तित्वासाठी झगडते
मोबा. ८६२३९९०८०७