◼️ काव्यरंग :- अहिंसा

अहिंसा

अहिंसेला मानले,
शूरवीरांचे आभूषण.
क्षमा करणे हेच,
सुविचारांचे लक्षण.

कुठल्याही शस्त्राविना,
बापू युद्ध लढले.
सत्याग्रहाच्या मार्गाने,
इंग्रजांचे भ्रम फोडले.

अहिंसेला साधन मानून,
सत्याला साध्य मानले.
ईश्वर सत्य आहे नव्हे,
सत्यास ईश्वर जाणले.

खादीचे उपरणे पंचा नेसून
पिडितांच्या जाणल्या वेदना,
षंढ समाजात जागवल्या,
दलितांविषयी संवेदना.

चरख्यावर वस्त्र विणून
स्वावलंबन शिकवले.
स्वतः हाती झाडू घेऊन
स्वच्छतेचे महत्त्व पटवले.

आज साबरमती आहे,
नवे रंग वस्त्र लेऊन,
पण बापू तुमचे विचार,
रुजलेत का हो मनातून?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *