◼️ काव्यरंग :- आवरण

आवरण

दुभंगली ही धरणीमाता
फाटले मायेचे आवरण
मायबापाच्या जाण्याने
झाले उदास हे जीवन…..

डोंगर दऱ्या पशुपक्षी
सारे तुम्हांसाठी रडले
विठ्ठल रुक्मिणी जोडी
प्रेम वात्सल्य दडले…….

गाय हंबरते दारात
आईच्या नैवेद्यासाठी
पाहून मजला तिच्याही
होते नयनी अश्रू दाटी……

दादा तुमच्यासाठीच
आईचा जीव आटला
तुमच्या पाठोपाठ आली
बघा तुमच्या भेटीला……

प्रेम मायेचे आवरण
देवा कारे हिरावलेस
रामकृष्ण नाम जपाने
कसे नाही वाचवलेस……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *