◼️ काव्यरंग :- देवा , तूच आता तारणहार

शीर्षक – देवा , तूच आता तारणहार

तूच माझी आई तूच माझा बाप;
तूच सांभाळ देवा आता जीवा लागली धाप,

भ्रष्टाचाराचा भस्मासूर वाढत चालला आहे आपोआप;
गरीब मात्र करीत आहे अन्नासाठीच हापाहाप,

‘लेक वाचवा’ अभियान अभियानाची वेळ आली आमच्यावर;
देवा आता तुम्हीच सांगा विश्वास कसा ठेवू तुमच्यावर,

बलात्कार करणाऱ्यांना उरला नाही कोणाचा धाक;
लक्ष्मणा तूच आता शुर्पणखे सारखं काप यांच सुद्धा नाक,

दुष्काळात पिण्यासाठी पाणी मिळत नाही आम्हाला;
देवा रोज आंघोळीला पाणी कोठून आणू तुम्हाला,

बेरोजगारीचा खाईत पडला आहे तरुण;
देवा तूच फेक नोकऱ्या आता पटापट वरून,

देवा आता तूच हाती घे योग्य ते माप;
नाहीतर तुझे आशीर्वाद देखील ठरतील आमच्यासाठी शाप.

◼️ कवी✍श्री.दीपक सुरेश सहाणे
नगरकर गुरुकुल प्राथमिक विद्यामंदिर,नाशिक रोड,नाशिक.संपर्क-8378937746

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *