!!..स्वराज्याची माय..!!
स्वराज्याच्या मावळ्यांनी,माय पाहिली,
राजमाता जिजाऊ,सर्वांना भावली..!!धृ!!
स्वराज्य निर्मितीचा
तिने घेतला वसा
बाळराजे शिवराय
सोबतीला दर दिवसा
वाघाची वाघीण बघा
सर्वांनी पाहिली..!1!
वीरतेचे धडे तिने
घेतले कष्टानं
सजविले स्वराज्य
मावळ्याच्या धाडसानं
जिजाऊत मीच आता
तुळजाई पाहिली..!2!
स्वराज्यात सामील केले
सारे विर बहुजन
घासातला घास दिला
आईची माया देऊन
कधी ना गणिताला
तिने हार मानली..!3!
डोईवर पदर तीने
नाही ढळू दिला
घोड्यावरती बसून
गणीम थोपीला
स्वराज्याच्या स्वप्नासाठी
दीन रात धावली..!4!
◼️ शिवकवी शिवश्री, आडसूळ पाटील
संभाजी ब्रिगेड, मा. जिल्हा संघटक
मो. 9325294198