-ll मन हे हळवे ll-
हरवले, नकळत
कोण कसे ते पळवे?
बालपण, शोधे मागे
परि, मन हे हळवे!
परीराणी, येई संगे
खेळू म्हणे भातुकली
छान डाव मांडियेला
आली, खारु पिटुकली!
हुपहुप झाडावर
करी कौतुके वानर
मीही म्हणते हजर
ससा आणतो गाजर!
वेलीवर घेता झोका
बालगीत गातो वारा
पक्षी देती सूरसाथ
मेळा जमवूनी सारा!
तन हे फुलपाखरु
फुल पानात रंगले
पाच वाजता, गजर
होता, स्वप्नच भंगले!
◼️🔶✍️🔶◼️
सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.