◼️ काव्यरंग :- माणूस विसरला नाते माणुसकीचे..

माणूस विसरला नाते माणुसकीचे..

मानवाने विसरली माणुसकी
तो शिकार करू लागला मुक्या जनावरांची.

आदिमानव मानत होता निसर्गालाच देव
धूर्त मानवा आतातरी संस्कृतीची जाणीव ठेव.

मानवाने केली जंगलतोड
ओझोनचा थर झाला कमी तरीही त्याची मोडली नाही खोड.

निसर्ग पुरवत होता सर्व मानवी अपेक्षा
निसर्गाच्या स्वाभिमानाला मानवाने केली शिक्षा.

मानवाने पोहोचविली पक्षी आणि प्राण्यांना जिवीत हानी म्हणूनच हंता, कोरोना सारखे आजार पडू लागले कानी.

तंत्रज्ञानी मानव ठेवू लागला स्टेटस हत्ती अपघाताचे
खरच माणूस विसरला नाते माणुसकीचे….

🔷🔷◼️✍️◼️🔷🔷

संग्राम संतोष सलगर ,रा. चव्हाणवाडी

पो. टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर
संपर्क क्रमांक- 7756844169, 7517885978

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *