◼️ काव्यरंग :- तू मला नाही म्हणाली

तू मला नाही म्हणाली

एक वर्षापूर्वी तुझं,
स्थळ चालून आलं
निश्चित नसल्यामुळे,
माझं येणं नाही झालं
बघून तुला गेल्यावर,
बातमी कानी आली
का गं, तू मला नाही म्हणाली?
बघण्यासाठी तुला,
आतुर झालो होतो
पहिल्याच भेटीमध्ये,
प्रेमात पडलो होतो
तुझ्या हसण्या बोलण्याने,
माझी झोप उडाली
का गं, तू मला नाही म्हणाली?
गावाजवळील गाव म्हणून,
भेटी होतील जास्त
लग्नापूर्वीचे दिवस आपण,
एन्जॉय करू मस्त
तुझ्यासोबत जगण्याचे,
नाना स्वप्न रंगवली
का गं, तू मला नाही म्हणाली?
नोकरी नव्हती माझ्याकडे,
पण होतं प्रेमळ मन
माझ्या अफाट प्रेमापेक्षा,
मोठं ठरलं धन
होशील तू दुसर्‍याची,
म्हणून वेदना खूप झाली
का गंं, तू मला नाही म्हणाली?
सखे सांग ना
का गं, तू मला नाही म्हणाली?
प्रिये सांग ना
का गं, तू मला नाही म्हणाली?

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

One Reply to “◼️ काव्यरंग :- तू मला नाही म्हणाली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *