◼️ काव्यरंग :- अंगठी ◼️✍️सौ.भारती तिडके, गोंदिया

अंगठी

अंगठी असते
प्रेमाचे प्रतिक छान
साक्षगंधाच्या वेळी
अनामिकेत असते शान

सोने, हिऱ्याची अंगठी
स्त्रियांची असते आवडती
श्रीमंतीची ऐट मिरवतात
बोटात घालून बागडती

विविध राशींच्या अंगठी
घालतात माणिक मोती
ज्योतिषशास्त्रानुसार
श्रद्धेला मानतात पोथी

लहान बालकाला
बारशात देतात अंगठी भेट
प्रेमीयुगल ही स्वप्न पाहतात
वचन घेतात अंगठीचे थेट

दागिने किती असले तरी
अंगठी ला महत्त्व फार
बोटे शोभून दिसतात
ललनाची इच्छा अपार

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *