◼️ काव्यरंग :- आई बाप मुलं ..!!

!!.. आई बाप मुलं ..!!

हातातल्या फोडावाणी मुलं जपली
आई बापाची सारी माया त्यांना दिली
त्यांच्याच पायावर त्यांना उभी केली
तुम्हाला काही कळत नाही म्हनाली
मग तुम्हीच सांगा मायबापा हो
दोष त्यांचा का,आई बापाचा ?..!1!

मुलांना भरपूर मोठ शिक्षण दिलं
शहरात त्यांना नोकरीला पाठवलं
थाटात त्यांच लग्नही करून दिलं
आई बापालाच त्यांनी दुर लोटलं
मग तुम्हीच सांगा मायबापा हो
दोष त्यांचा का,आई बापाचा ?..!2!

जमीन जुमला त्यांच्या नावावर केला
पैसा अडका हवाली करून दिला
दाग दागिनं सर्वकाही वाटून दिले
चतकोर भाकरीला परावलंबी केले
मग तुम्हीच सांगा मायबापा हो
दोष त्यांचा का,आई बापाचा ?..!3!

आता आमच्या दोघांचही वय झाले
आमचे हात पाय सारे थकुन गेले
अवयव सारे काम करेणासे झाले
त्यांनीच आम्हाला वृद्धाश्रम दावले
मग तुम्हीच सांगा मायबापा हो
दोष त्यांचा का,आई बापाचा ?..!4!

संभाजी ब्रिगेड, मा. जिल्हा संघटक
संभाजीनगर औरंगाबाद
मो. 9325294198

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *