◼️ काव्यरंग :- जुन्याची जाण नव्याचे भान

जुन्याची जाण नव्याचे भान

चुलीच्या जागी आलीया शेगडी;
अन बायकोला माझ्या भरली हुडहुडी,

पाटा-वरवंट्याच्या जागी आला मिक्सर;
धोपाटण्यानेच मारते माझी आई सिक्सर,

चटणी-भाकरीच्या जागी पिझ्झा म्हणतो मीच;
डायटिंग चालू असतांनासुद्धा जाडी होणारी सासू हीच,

दगडाच्या जागी आलीया वॉशिंग मशीन;
अन मोलकरीण असली तरी सोफ्यावरच बसीन,

गाडी आल्यापासून पायी नाही चालायचं;
अन पोट सुटल्यावर मात्र कशाला मग रडायचं,

म्हणून म्हणतोय मित्रांनो,बदलू नका काही
नाहीतर तुमची दशा पाहून हसू आवरणार नाही.

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *