वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

खांबाला येथील मारोती पेंदोर यांचा मृत्यू

राजुरा :-  तालुक्यात वाघाची दहशत चालूच आहे. खांबाला येथील एका शेतकऱ्याला जागीच ठार करून त्याचा शरीराचे तुकडे तुकडे केले.

मारोती पेंदोर याचे खांबाडा गावाला लागून शेत आहे. तो काल दुपारी जवळच असलेल्या कंपार्टमेंट 178 मधील घटना
जंगलाशेजारच्या भागात तो पाळीव जनावरांना चरण्यासाठी गेला होता. परंतु घरी परत आला नसल्याने आज सकाळपासून शोध घेतला असता जंगलात वाघाचे हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा लोकांचा बळी गेला.

सदर घटनेची माहिती मिळताच राजुरा शिवसेनेचे पदाधिकारी बबनराव उरकुडे, राजू डोहे, निलेश गंपावार, उमेश गोरे, बाळू कुईथे, यांनी अधिकारी विकेश कुमार गलगट यांच्याशी चर्चा करून पीडित कुटुंबाला अंत्यविधीसाठी 1 लाख रोख रक्कम आणि मुलगा देवानंद मारोती पेंदोर (33) याला वनविभागाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्या वाघाला लवकरात लवकर बंदीस्थ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *