◼️ काव्यरंग :- सलाम वीरा नमन तुला हे

 

सलाम वीरा नमन तुला हे

सलाम वीरा तुला नमन है
प्रतिकूल परिस्थितीत लढतो
खडतर जीवन जगून
देशास आपल्या रक्षितो

सलाम वीरा तुला नमन हे
भारत मातेचा रक्षक तू खास
जीवाची बाजी लावून तू
देशात शांततेचा ठेवतो अधिवास

सलाम वीरा तुला नमन हे
दुर्गम निसर्गावर मात तूच करतो
तमा जीवाची न बाळगता
शत्रूशी तू रात्रंदिवस झुंजतो

सलाम वीरा तुला नमन हे
देश कर्तव्यास जागतोस
घरादाराचा त्याग करूनी
युद्धास सज्ज होतोस

सलाम वीरा तुला नमन हे
शौर्याचा नसे कधी विसर
असीम बलिदान तुझे
सैनिका आहेस तू अमर

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *