◼️ काव्यरंग :- नाते भाऊबहिणीचे

नाते भाऊबहिणीचे

भाऊ बहिणीचे नाते
जणू मोहर जाईचा,
मायेचा तो स्पर्श त्याला
वाटतो आईचा !
भाऊबहिणीचे नाते जणू
पिंपळाचे पान,
किर्ती भावाची ऐकता
तिला वाटे अभिमान !
भाऊबहिणीचे नाते जणू
आम्रतरूची ती छाया,
आई परीस सरस भासे
बहिणीची माया !
भाऊबहिणी चे नाते
कधी नसते फसवे,
बहिण सासरी जाताना
भाऊ लपवी आसवे !
भाऊबहिणी चे नाते
वाटे देवाला नवलाई,
द्रौपदी च्या संकटात
बंधू कृष्ण धावे घाई !
भाऊबहिणी चे नाते जणू
पर्जन्याची धार,
मातपित्याच्या माघारी
भाऊ बहिणीचा आधार !
जोडूनी हात देवा
तुला करीते विनंती,
सुखी राहो भाऊराया
बंधन अतुट जगती !

◼️🔷✍️🔷◼️

सौ.सुनिता नाईक, कुरुळी
ता.खेड जि.पुणे., मो.8080362939

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *