पुज्यनिय पाय…
त्या जुन्या घरात माझे असे काय होते
थकलेल्या बापाचे पुज्यनिय पाय होते…
सुखाच्या पानांवर दुःखाच्या भाग्यरेषा
पाठीवर घामाचे असे अध्याय होते…
आहे तेथेच आक्रोश तुझ्या क्रांतीचा
जेथे तुझ्या आसवांचे व्यवसाय होते…
होता न कोणी तुझ्या कष्टास पुजणारा
मातीच्या कुळाचे साधे अभिप्राय होते…
मिसळून ही मिसळेना रंग आपल्यांचा
रक्ताचे रक्तावर तसे अन्याय होते…
तुझ्या पाठीमागे बदलले त्यांचे चरित्र
ते दिखावे जमान्याचे हाय हाय होते…
त्या जुन्या घरात माझे असे काय होते….
Moba. ९६८२१३००८५