जिंकू किंवा मरू
देशाची आमुच्या शान,
सीमेवरती लढतो जवान,
घेऊनी तळहातावर प्राण,
मायभूच्या संरक्षणाची आण,
शत्रुला मागे सारु,
जिंकू किंवा मरु,
भारतभूचा ध्वज ऊभारु,
संकटी देशाला तारु,
आठवु इतिहास स्वातंत्र्याचा ,
क्रांतिकारक अन् विरांचा,
त्याग समर्पण बलिदानाचा,
भूमातेच्या थोर सुपूत्रांचा,
आले संकट देशावरी,
येऊ एकत्र सारी,
तुटून पडू शत्रुवरी,
घेऊनी शस्त्र करी,
आपसातील विसरुन द्वेष,
धरु रणचंडिकेचा वेश,
करुया शत्रुला नामशेष,
ठेवूया सुरक्षित भारतदेश.
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️