... कर्तव्य…
कुटुंबामध्ये जन्म घेतला
समाजात वावरत आहे
लहान मोठ्याचा मान ठेऊन
संस्काराचे धडे घेत आहे…
शाळेमध्ये प्रवेश घेतला
लिहाया वाचाया शिकत आहे
महापुरुषांची जाणीव ठेऊन
चारित्र्य त्यांचे वाचत आहे…
लहान मोठे कार्यक्रम घेऊन
समाज प्रबोधन घडवायच आहे
प्रत्येकाला आपले समजून
माणुसकीने जगायचं आहे…
स्वच्छ सुंदर गाव बनविण्या
सर्वांनी एकत्रीत यायच आहे
आदर्श गाव निर्माण करण्या
हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे…..
कवि:- राज गुरनुले
मु.पो.गुंजेवाही (कोठा) ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर
मो.नं.9527873626
◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️