◼️ काव्यरंग :- शिक्षणरूपी जागर नारीशक्तीचा..

शिक्षणरूपी जागर नारीशक्तीचा..

ज्ञानाच्या ठिणगीला शिक्षणरूपी वारा दे,
अन् तिला क्रांतिचा सूर्य होऊ दे;
अज्ञानावर प्रहार करणारा वणवा आता पेट घेऊ दे,
अन् तिच्या आयुष्यात शिक्षणरूपी क्रांतीची ज्योत तेवू दे!!
यशाच्या शिखरावर तिच्या ज्ञानाची मुहूर्तमेढ रोऊ दे
अज्ञानाला जाळणाऱ्या आगीची ज्योत तरी तिला होऊ दे!!
तिच्या कलागुणांनी आणि इच्छाशक्तीने उंच भरारी तिला आता घेऊ दे;
तिच्या संस्कारांच्या मोहक सुगंधांनी या जगाला पण आता मोहू दे!!
बदल घडवण्यासाठी पेटलेल्या वणव्याची ठिणगी तरी तिला होऊ दे;
होणाऱ्या परिवर्तनाची साक्षीदार म्हणून क्रांतीची मशाल हाती घेऊ दे!!
आता, तिला अडवू नका, ज्ञानरूपी क्रांतीच्या मार्गाने तिला जाऊ दे;
अज्ञान आणि ज्ञान यांच्या युद्धातली सैनिक तरी तिला आता होऊ दे!!
त्यागाचा आणि शौर्याचा प्रतिक असलेला विजयी ध्वज आता तिला हाती घेऊ दे;
अन् हे ज्ञानरूपी क्रांतीचं महायुद्ध लढण्यासाठी तिला आतातरी जन्माला येऊ दे!!
मुलगी नावाच्या एका ज्ञानरूपी क्रांतीला समाजात बदल आता घडवू दे;
पुरूषप्रधान संस्कृती मोडून काढण्यास तिच्या बाहूंत आता बळ एकवटू दे!!
तिच्या अस्मितेची आणि तिच्या अस्तित्वाची झुंजार लढाई लढण्यास आता तिला सज्ज होऊ दे;
अन् आता तरी तिचा नारीशक्ती,स्त्रीशक्ती म्हणून
अखंड जगभर गौरव होऊ दे!!

◼️🔷✍️🔷◼️

कवी : पृथ्वीराज भरत यादव.
कडेगांव, सांगली, मो.७७७४८२८८७२.

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

One Reply to “◼️ काव्यरंग :- शिक्षणरूपी जागर नारीशक्तीचा..”

  1. या शब्दांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणं, हेच पुरूष असल्याचं लक्षण आहे 🙏🙏❤
    पृथ्वीराज,
    आपल्या काव्याला अधिकाधीक सत्याचा रंग प्राप्त व्हावा….. हीच सदिच्छा 💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *